Tue, Apr 23, 2019 23:50होमपेज › Sangli › मटका अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

मटका अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:31AMइस्लामपूर : वार्ताहर

जिल्हा पोलिसप्रमुखांच्या विशेष पथकाने येथील शिवनगर परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. रोख रक्‍कम, 11 मोटारसायकल असा सुमारे 6 लाख 94 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार झाला. ही कारवाई गुरुवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

गणेश दिलीप पाटोळे (वय 28), कुणाल बाजीराव पाटील (वय 19), सुजित राजेंद्र शिंदे (वय 22), संजय किसन कांबळे (वय 50, रा. ), प्रशांत प्रकाश देवकुळे (वय 19), विश्‍वास भीमराव नाईक (वय 42), रफीक इकबाल सय्यदखान (वय 36), ऋषिकेश राहुल पाटील (वय 19), अनिल संपत पाटील (वय 29), संग्राम बाळासाहेब पवार (वय 23), विजय रमेश जाधव (वय 26), उमेश संतोष पवार (वय 19), आदित्य अरुण धोत्रे (वय 20), किरण भालचंद्र देशपांडे (वय 56), हणमंत केशव गुरव (वय 64, सर्व रा. इस्लामपूर) अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत. तर घरमालक सोपान उर्फ काकासाहेब नामदेव नागे हा फरार आहे. 

अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाने विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित जाधव, हेड कॉन्स्टेबल पाटील, सदामते, कांबळे, माळी, पाथरवट, चव्हाण, पाटील, धुमाळ, जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला खबर्‍यामार्फत येथील शिवनगर परिसरातील तिरंगा चौकातील  एका बंगल्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
गुरूवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास या पथकाने या ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी दोन खोल्यातून फोनवरून मटका घेतला जात असल्याचे उघडकीस आले. या छाप्यात रोख रक्कम 46 हजार 540, 1 लाख 5 हजार किंमतीचे 19 मोबाईल, 5 लाख 40 हजार रुपयांच्या 11 मोटारसायकल, मटक्याच्या चिठ्ठ्या, कॅल्क्युलेटर असा एकूण 6 लाख 94 हजार 414 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी विशेष पथकाचे हेड कॉन्स्टेबल मारूती रामचंद्र मोरे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.