Tue, Mar 19, 2019 09:17होमपेज › Sangli › मटक्याच्या दोन टोळ्या हद्दपार

मटक्याच्या दोन टोळ्या हद्दपार

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 21 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

इस्लामपूर शहर परिसरात बेकायदा मटका अड्डे चालवून लोकांची लुबाडणूक केल्याप्रकरणी तसेच गुंडगिरी करून दहशत माजविल्याप्रकरणी मटका अड्डे चालविणार्‍या दोन टोळ्यांतील बाराजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी त्यांच्या हद्दपारीचे आदेश दिले. 

शिवाजी मुर्गाप्पा बामणे (वय 27, रा. साखराळे), अरूण वसंत तोंदळे (वय 50, रा. ताकारी), रमेश बापू गडकरी (वय 38, रा. बोरगाव),  सुशांत सुभाष पाटील (वय 28), फिरोज नजीर मुंडे (वय 52), मोहन सुरेशचंद्र पिसे (वय 45), दीपक निळकंठ चितारे (वय 48), राजेंद्र दगडू सूर्यवंशी (वय 42), किर्तीकुमार रूपचंद शहा (वय 40), चंद्रकांत एकनाथ यादव (वय 50), रमेश राजाराम लोळगे (वय 40), सचिन जगन्नाथ गुरव (वय 33, सर्व रा. इस्लामपूर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.  

या दोन्ही टोळ्या इस्लामपूर शहर आणि परिसरात बेकायदा मटका अड्डे चालवत होते. टोळीप्रमुख आणि त्यांचे साथीदार यातून मिळालेल्या पैशातून गुंडगिरी करणारे टोळके व्यवसायाच्या ठिकाणी जमा करत होते. या टोळक्याचा महिला, शाळकरी मुले, मुली यांना नाहक त्रास होत होता. तसेच त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे अधीक्षक शर्मा यांनी दोन टोळ्यांतील बाराजणांना तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

Tags : sangli, Matka issue, two Gangs, Expat Action, sangli news,