Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Sangli › मिरजेतील मतीन काझी टोळी हद्द पार

मिरजेतील मतीन काझी टोळी हद्द पार

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

मिरजेत खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण, सरकारी नोकरांवर हल्ला, दमदाटी यासारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल असणार्‍या गुंड मतीन काझीसह त्याच्या टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली.  

मतीन साहेबपीर चमनमलिक उर्फ मतीन काझी (वय 22, रा. टाकळी रस्ता), इसरार सलीम काझी (वय 30, रा. गुरुवार पेठ), अस्लम करीम सय्यद उर्फ बॅटरी अस्लम (वय 40, रा. छलवादी गल्ली), साहिल उर्फ अकिब अफजल शिलेदार (वय 23, रा. पिरजादे प्लॉट), एजाज इरफान बारगीर (वय19, रा. नदाफ गल्ली), रिजवान मीनाजुद्दीन शिकलगार (वय 21, रा. पिरजादे प्लॉट), नदीम लाजाम खतीब उर्फ खलनायक (वय 22, रा. खतीब गल्ली), रईस अब्दुल बारीखान उर्फ पठाण (वय 22, रा. मुजावर गल्ली), आशू उर्फ यासीन रमजान मुजावर (वय 21, रा. माळी गल्ली), सद्दाम अब्दुलगणी मुल्ला (वय 22, रा. माळी गल्ली), बारक्या उर्फ बंदेनवाज अब्दुलगणी मुल्ला (वय 20, रा. माळी गल्ली, मिरज) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. 

टोळीप्रमुख मतीन काझीसह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण करून मारहाण, सरकारी नोकरांवर हल्ला, दमदाटी, शिवीगाळ असे नऊ गुन्हे दाखल आहेत.  मिरज शहर पोलिसांनी टोळीविरूद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव अधीक्षक शर्मा यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी मतीन काझीसह 11 जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक जीवन राजगुरू, विशाल भिसे, शशिकांत जाधव यांनी यासाठी काम पाहिले.