Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Sangli › सासरच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या

सासरच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 11:44PMआटपाडी : प्रतिनिधी

खरसुंडी (ता. आटपाडी)  येथील सातपुते वस्तीवरील संगीता शिवाजी सातपुते (वय 35) या विवाहितेने रविवारी सासरच्या जाचाला कंटाळून घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत मृत संगीताचे वडील लक्ष्मण जगन्‍नाथ कोळेकर (रा. बाळेवाडी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बाळेवाडी येथील संगीताचा विवाह 14 वर्षांपूर्वी शिवाजी सातपुते यांच्याशी झाला होता. लग्‍नानंतर घरकाम जमत नाही. स्वयंपाक येत नाही, या कारणावरून संगीताला मारहाण व शिवीगाळ केली जात असे. सासरच्या मंडळींच्या या त्रासाला कंटाळून आज सकाळी घरी कोणी नसताना संगीताने घराच्या पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी सासरे श्रीपती यशवंत सातपुते, सासू येसुबाई, नणंद जयाबाई रामचंद्र पडळकर, नणंदेचा पती रामचंद्र सखाराम पडळकर, नणंदेचा मुलगा दत्तात्रय पडळकर यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. वाघ करीत आहेत.