होमपेज › Sangli › तासगावात मराठा समाजबांधव आक्रमक 

तासगावात मराठा समाजबांधव आक्रमक 

Published On: Aug 09 2018 6:16PM | Last Updated: Aug 09 2018 6:20PMतासगाव : प्रतिनिधी

क्रांती ठोक मोर्चाच्या निमीत्ताने मराठा समाज बांधव आक्रमक होऊ लागला आहे. गुरुवारी महाराष्ट्र बंदच्या वेळी गावोगावीच्या मराठा बांधवांनी प्रमुख चौक आणि रस्त्यावर  टायर पेटवून भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मराठा समाजाच्या संयमाचा बांध फूटू लागला आहे. हे बलीदान व्यर्थ जाऊ नये यासाठी समाजाचे तरुण रस्त्यावर उतरु लागले आहेत.

गुरुवारी सकाळी चिंचणी येथील तरुण मुख्य चौकात जमा झाले. स्व काकासाहेब शिंदे यांच्यासह आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलन काळात प्राणांची आहूती दिलेल्या बांधवांना आदरांजली वाहिली. 

आक्रमक झालेल्या मराठा तरुणांनी शिरगाव- तासगाव रस्त्याच्या मध्यभागी टायर पेटवले. तासगाव-विटा मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. याचबरोबर तालुक्यातील असंख्य गावातील मराठा बांधवांनी टायर पेटवून चक्का जाम केला. आमदार सुमनताई पाटील यांनी तसगाव येथे मराठा समाजाच्या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला.