Sun, Feb 17, 2019 10:12होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी येडेमच्छिंद्रमध्ये धरणे 

मराठा आरक्षणासाठी येडेमच्छिंद्रमध्ये धरणे 

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कृती समितीतर्फे सोमवार( दि. 21) पासून वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अधिकराव पाटील यांनी दिली.ते म्हणाले,  मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येक सरकारने समाजाला झुलवत ठेवले आहे. समाजातील मुला-मुलींना शिक्षण व नोकरीत आरक्षणाची गरज आहे.त्यासाठी ही लढाई आता गतीने सुरु केली जाणार आहे.

याची सुरुवात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या गावातून केली जाणार आहे. दि. 21 पासून बेमुदत हे आंदोलन केले जाणार आहे. यात ग्रामस्थ व परिसरातील मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य 21 पासून सांगली, कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांनाही शिष्टमंडळ घेवून निवेदन दिले जाणार आहे. आरक्षणाबाबत सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे.