Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Sangli › मराठा आरक्षण : आष्ट्यात चक्‍काजाम

मराठा आरक्षण : आष्ट्यात चक्‍काजाम

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 30 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आष्टा (ता. वाळवा) येथे रविवारी चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. अमरापूर (ता. कडेगाव) येथे रास्ता रोको करण्यात आला. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे बंद पाळून निषेध व्यक्‍त करण्यात आला. 

आष्टा येथे सांगली-इस्लामपूर रस्त्यावर  बसस्थानक चौकात सकाळी चक्‍काजाममुळे सांगली, इस्लामपूर व वडगाव रस्त्यांवर  वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बोलताना दिग्विजय पाटील म्हणाले, मनूने निर्माण केलेली चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था परत आणण्यासाठी सत्तेवर आलेले सरकार बहुजन समाजाचा द्वेष करणारे आहे. सापाची अफवा उठविणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातच विषारी विचार आहेत. मराठा समाजाला आरक्षण न देणार्‍या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

विराज शिंदे, किरण काळोखे, प्रवीण माने, उदय कुशिरे, महेश गायकवाह, संदीप गायकवाड, धैर्यशील थोरात, सुनील माने व अमीर फकीर यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

अमरापुरात रास्ता रोको

कडेगाव : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व ठोक मोर्चाला पाठिंबा म्हणून अमरापूर  येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी गावातील सर्व व्यापारी, दुकानदार तसेच ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला. तरूणांनी गावातून रॅली काढून महामार्गावर  हुतात्मा काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहिली. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांना निवेदन  देण्यात आले. 

कसबे डिग्रजमध्ये बंद

कसबे डिग्रज :   येथे आंदोलनाला पाठिंबा म्हणून  गावातील सर्वव्यवहार उत्सफूर्तपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.   तरुणांनी गावातून मोर्चा काढला. तलाठी एल. के. रूपनर यांना निवेदन देण्यात आले.  पंचायत समिती सदस्य अजय चव्हाण, उपसरपंच प्रमोद चव्हाण, मोहन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संदिप निकम, संजय शिंदे, दिनकर शिंदे, अजित काशिद, संभातात्या चव्हाण, सागर कदम, गिरीश चव्हाण उपस्थित होते.