होमपेज › Sangli › मांजर्डेत गुंडांचा धुमाकूळ, हवेत गोळीबार

मांजर्डेत गुंडांचा धुमाकूळ, हवेत गोळीबार

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 11:02PMमांजर्डे : वार्ताहर

मांजर्डे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी (दि.22) रोजी गावदेवावेळी दोघा अज्ञात गुंडांनी धुमाकूळ घातला. हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तासगाव पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

मांजर्डे गावामध्ये शुक्रवारी रात्री गावदेव सुरू होते. बसस्थानक चौकात अचानक दोन अज्ञात तरूण आले. त्यांनी महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. याची माहिती गावातील तरुणांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची चांगली धुलाई केली. त्यानंतर अज्ञात तरून त्या ठिकाणाहून निघून गेले. काही वेळाने ते परत आहले. त्यांनी  आपल्या जवळ असणार्‍या गावठी कट्टा काढून एकाच्या कानाला लावून जिवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर दोघांनी हवेत गोळीबार केला.  

गोळीबारचा आवाज ऐकून तेथे  40 ते 50 तरुण तात्काळ धावत आले. या तरुणांना पाहून गुंडांनी आरवडेच्या दिशेने पळ काढला. त्यांचा  तरुणांनी पाठलाग सुरू केला.आरवडे रस्त्यावरील सिद्धेश्वर कॉलनी येथे  गुंडांनी दुचाकी (एम. एच 12 इ एफ 5956) सोडून पसार झाले. तेव्हा त्यांनी दुचाकी फोडली आहे. सदरचे गुंड कोण होते याबाबत माहिती मिळाली नाही. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नाही.