Thu, May 23, 2019 21:01
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › विट्यात माजी सैनिकाची ‘मिमिक्री फेमस’ (Video)

विट्यात माजी सैनिकाची ‘मिमिक्री फेमस’ (Video)

Published On: Feb 10 2018 6:24PM | Last Updated: Feb 10 2018 6:27PM विटा : विजय लाळे 

भर दुपारी सगळीकडे शांत वातावरण असताना एका घराच्या बाहेर अचानक गाढव ओरडल्याचा आवाज येतो अन् लगोलग त्या घराबाहेर बांधलेले कुत्रे अचानक भुंकायला सुरुवात करते. बारकाईने लक्ष दिले तर गाढवाच्या ओरडण्याचा आवाज हा चक्क घरातूनच आला आणि त्या घर मालकाचे कुत्रेच भुंकत होते. 

घरात गाढव हा काय प्रकार म्हणून डोकावून पाहिले तर अंगात सफारी, डोक्यावर कॅप, रंग काळा सावळा मजबूत बांधा असलेला व्यक्ती चक्क गाढव ओरडल्याचा आवाज काढत होता. तानाजी दगडू जाधव या माजी सैनिकाने आळसंद (ता विटा सांगली) परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तानाजी यांना कावळा, मांजर, कुत्रे, गाढव आणि अन्य पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढता येतात. तसेच  इंजिनचा आवाज  पिकावर फवारणी करणाऱ्या पंपाचा आवाज इतकेच काय दारुड्याची नक्कलही ते अगदी चोखंदळपणे करतात. 

१७ वर्षे भारतीय लष्करात नोकरी करणारे जाधव विविध शाळा कॉलेज, नवरात्र मंडळे, पोलीस स्टेशन, गणेश मंडळाच्यावतीने आजोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमातून दारू बंदी, भ्रूणहत्या बंदी, हुंडा बंदी व्यसनमुक्ती आदी बाबत आपल्या कलेतून जनजागृतीचे काम करत आहेत.