Mon, Apr 22, 2019 15:50होमपेज › Sangli › मामेसासर्‍याला आज न्यायालयात हजर करणार 

मामेसासर्‍याला आज न्यायालयात हजर करणार 

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:26PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळेच्या  पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्याच्या घरावर सीआयडीच्या पथकाने छापा टाकला होता.  

अनिकेतच्या खुनासंदर्भातील सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणात कामटेसह अन्य संशयितांना फोन करणार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे. अजूनही काहीजणांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी काही पोलिसांचीही चौकशी करण्यात आली आहे. तपासाच्या अन्य बाबी पूर्णत्वाकडे असून आयर्विन पुलाजवळ अमोल भंडारेला धरून बसलेल्या दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. 

भंडारेला धरून बसणारे दोघे असल्याच्या संशयावरून अनेकांकडे चौकशीही करण्यात येत आहे. याप्रकरणी सीआयडीचे अधिकारी कसून तपास करत असून लवकरच त्या दोघांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.