Fri, May 24, 2019 07:20होमपेज › Sangli ›  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या मेकअप- हेअर स्टाईल वर्कशॉपला अंकलीत प्रतिसाद

 दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या मेकअप- हेअर स्टाईल वर्कशॉपला अंकलीत प्रतिसाद

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 8:40PMसांगली : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे अंकली येथे मेकअप हेअर स्टाईल वर्कशॉपला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महिलांना घराची जबाबदारी सांभाळत स्वत:कडे लक्ष देता  येत  नाही. त्यामुळे या वर्कशॉपमध्ये किशोरी साळुंखे यांनी घरच्या घरी उपाय करुन आपले सौंदर्य कसे निखारता येईल याचे  मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांमधून त्यांनी हेअर स्टाईल व मेकअपचे प्रत्यक्षिक करुन दाखविले. त्यामुळे महिलांना आपण स्वत:सुध्दा हेअर स्टाईल व मेकअप करुन अधिक सुंदर दिसू शकतो, हे त्यांनी मान्य केले.