Thu, Jun 20, 2019 01:53होमपेज › Sangli › भिडे यांच्यावरील गुन्ह्यांची श्‍वेतपत्रिका काढा

भिडे यांच्यावरील गुन्ह्यांची श्‍वेतपत्रिका काढा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

भीमा- कोरेगाव येथे जातीय दंगल घडविण्यात आली. या दंगलीमागचे प्रमुख सूत्रधार संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी भिडे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती श्‍वेतपत्रिकेद्वारे जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. भिडे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चावेळी विनापरवाना होर्डिंग्ज लावण्यात आली. त्यामुळे मोर्चाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक  भिडे यांचा मिरज दंगल प्रकरण, जोधा- अकबर चित्रपटाला विरोध अशा  अशा अनेक प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांची चौकशी करावी. शिवप्रतिष्ठानच्या मोर्चास पोलिसांची परवानगी होती का,  याबाबत पोलिसांनी खुलासा करावा. जर परवानगी नसेल तर पोलिसांनी संयोजकांवर गुन्हा दाखल करणार का?  

या मोर्चाबाबत महानगरपालिका क्षेत्रात विनापरवाना काही डिजिटल, होर्डिंग लावण्यात आले. अशाच प्रकारचे एक डिजिटल कर्मवीर चौकाजवळ असणार्‍या जिल्हा  बँके शेजारी, सांगली - मिरज रोड येथे सुमारे 30 फुटांचे बेकायदेशीर डिजिटल लावण्यात आले आहे. त्याला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत कोणतीही कारवाई मनपा प्रभाग समिती दोनचे सहाय्यक आयुक्त खरात यांनी केली नाही. तसेच अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांनी बेकायदेशीर होर्डिंग काढले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा वापरही विनापरवाना पार्किंगसाठी करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

भारिप बहुजन महासंघाचे सचिव अशोक कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल वेटम, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, अमोल हर्ष, गौतम भगत, अमोल भंडारे, गणेश सरोदे, भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव रुपेश तामगावकर, बहुजन नायक पार्टीचे अध्यक्ष प्रमोद सांगले, देवधर सांगले आदी उपस्थित होते. 

 

Tags : sangli, sangli news, Sambhaji Bhide, crime, Ambedkaris Organization,


  •