Sun, Apr 21, 2019 00:02होमपेज › Sangli › सांगलीत बाजारपेठा, एसटी बंद(व्हिडिओ) 

सांगलीत बाजारपेठा, एसटी बंद(व्हिडिओ) 

Published On: Jan 03 2018 12:31PM | Last Updated: Jan 03 2018 2:07PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ आज सांगलीतील प्रमुख बाजारपेठा बंद करण्यात आल्‍या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळ सत्राच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील एसटी बस सेवा बंद झाली आहे. तणावाची परिस्थिती लक्षात घेत शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

विट्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. भारिप बहुजन महासंघ, दलित महासंघ, रिपाईसह दलित संघटनानी आज सांगली बंदचे आयोजन केलं आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि छोटे मोठे उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष कुमक मागवून चोख बंदोबस्त ठेवला आहे.