Mon, Sep 24, 2018 11:02होमपेज › Sangli › महाराष्ट्र सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत तुंगच्या प्रतीक्षा बागडीला अजिंक्यपद  

महाराष्ट्र सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत तुंगच्या प्रतीक्षा बागडीला अजिंक्यपद  

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 8:18PMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्र महिला सब ज्युनिअर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तुंगच्या प्रतीक्षा रामदास बागडी हिने 69 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. सांगली जिल्ह्याला प्रथमच अजिंक्यपद मिळत आहे. बागडी हिचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. तुंग येथे मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. 

नागपूर येथे नुकतेच महाराष्ट्र महिला वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली. सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 69 किलो वजन गटात उपांत्य फेरीत सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कोल्हापूरच्या ऋतुजा संकपाळला चितपट केले. अंतिम फेरीत प्रतीक्षा बागडीने पुण्याच्या हर्षदा जाधव हिच्यावर 7-4 ने मात करत अजिंक्यपद पटकावले. 

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल तुंग येथे बागडी हिचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. मनमंदिर महिला कुस्ती केंद्र तुंगचे संस्थापक रामदास बागडी, कुस्ती कोच किसन घाटगे, बिरोबा तालीमचे अध्यक्ष एकनाथ कापसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रतीक्षा बागडी ही राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे.