Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Sangli › 'शेतकर्‍यांसाठी मनसे खळ्ळ खट्याक करणारच'

'शेतकर्‍यांसाठी मनसे खळ्ळ खट्याक करणारच'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विटा : प्रतिनिधी 

चारा छावणी भ्रष्टाचार करणाऱ्यांबाबत सरकार उदासीन आहे, उगाच मी मारले, तू रड अशी अवस्था असेल तर या भ्रष्टचाऱ्यांच्या  विरोधात मनसेचे खळ्ळ खट्याक करेल असा इशारा मनसेने दिला आहे. शेतकरी असो, अगर ग्रामीण भागातला सामान्य माणूस असो, त्याच्यावर जिथे अन्याय होत असेल तिथे मनसे खळ्ळ खट्याक करणारच असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, योगेश चिले यांनी दिला. 

विट्यात मनसेचा तालुका निहाय पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याकरिता मनसेच्या सरचिटणीस गुप्ता, योगेश चिले, रस्ता आस्थापना विभागाचे अध्यक्ष योगेश परुळेकर , उपाध्यक्ष विनय भोयटे, रावसाहेब कदम, जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, आदित्य पटवर्धन आदी पदाधिकारी त्यांच्या सोबत विट्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी मनसेच्या आगामी वाटचालीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या आम्हाला ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही पक्षाच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना वेळ देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आमचा पक्ष तसा वयाने इतरांच्या पेक्षा लहान आहे. त्या मानाने शहरी भागात जोमाने वाढतो आहे. ग्रामीण भागातले प्रश्न आणि समस्याच वेगळ्या आहेत. समस्या कोणत्याही असो उत्तर फक्त मनसे हे राज साहेबांचे ध्येय आहे. त्यामुळे आमच्या पक्षात प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्या त्या विषयाचे तज्ञ् त्यात आहेत. काही गोष्टी सरकार करत नाही किंवा अपुरे पडते. सरकार काही करेल यापेक्षा तिथे आम्ही पक्षाच्यावतीने पुढे असतो. दुष्काळी भागात आम्ही चारा छावण्या स्व-खर्चाने सुरु केल्या होत्या. राज्यातले ५० टक्के टोल नाके आमच्या आंदोलनानंतर बंद झाले. डाळींब आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसवणारे बहुतांश व्यापारी अगर दलाल हे परराज्यातलेच आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ते दिवसा ढवळ्या फसवतात, त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. लवकरच तालुकावार आणि गावनिहाय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आम्ही घेणार आहोत. 

रस्ते बांधणी आस्थापनाचे अध्यक्ष योगेश परुळेकर यांनी आम्ही राज्यातल्या रस्त्यांची दुरवस्था आणि सद्यस्थिती याबाबत राज ठाकरे यांना अहवाल देणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, आज आज झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात काही पक्ष प्रवेश ही झाले. यावेळी पत्रकारांनी सन २०१३-१४ मध्ये राज्यात चारा छावणी घोटाळा झाला, याबाबत उच्च न्यायालयात केस दाखल झाली, त्यानंतर न्यायालयाने फटकारल्यानंतर संबंधितांवर केसेस दाखल झाल्या आहेत पण त्यांच्यावर इतर काही कारवाई होताना दिसत नाही. चारा छावणी भ्रष्टचाऱ्यांच्या विरोधात मनसेचे खळ्ळ खट्याक करेल असा इशारा दिला. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव, सुनीता इनामदार, खानापूर तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, आटपाडीचे तालुकाध्यक्ष श्रीधर घाडगे, विटा शहराध्यक्ष साजिद आगा, फरीदा नदाफ, संदीप मुळीक, सलमान आगा, दीपक हराळे, ज्योती हराळे आदी उपस्थित होते.

Tags : Maharashtra Navnirman Sena, style, farmer, strike, vita, sangli, pudhari news


  •