होमपेज › Sangli › एमएससीआयटी मुदतवाढ, शिक्षकांच्या बदली धोरण दुरुस्तीची घोषणा महत्त्वपूर्ण

एमएससीआयटी मुदतवाढ, शिक्षकांच्या बदली धोरण दुरुस्तीची घोषणा महत्त्वपूर्ण

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 8:55PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

‘एमएससीआयटी’ला दि. 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्तीची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा महत्वपूर्ण आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लागण्यात शिक्षक अधिवेशन महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी दिली. 

शिक्षक बँकेचे अध्यक्ष श्रेणिक चौगुले, सुनील गुरव, शशिकांत भागवत, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, श्रीकांत माळी, उत्तम जाधव, सदाशिव पाटील, शिवाजी पवार, महादेव माळी, रमेश पाटील, बाळासाहेब आडके, हरिबा गावडे, राजाराम सावंत उपस्थित होते. 

दि. 31 मार्चपर्यंत एमएससीआयटीस मुदतवाढ देण्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. त्याचा  30 हजारांवर शिक्षकांना लाभ होणार आहे.  बदली धोरणातील त्रुटींची दुरुस्ती, तालुकाबाह्य बदल्या होणार नाहीत. शिक्षकांना बीएलओ काम दिले जाणार नाही,  असे आश्‍वासन मुंडे यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षक पहिल्या दहा वर्षात मृत झाल्यास 10 लाखांची मदत देण्याचे धोरण शासन राबवित असल्याची घोषणा तावडे यांनी केल्याची माहिती देण्यात आली.  दरम्यान, बक्षी समितीचा अहवाल आल्यानंतर सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितल्याची माहिती दिली.