Wed, Sep 19, 2018 14:27होमपेज › Sangli › खा. संजय पाटील यांना कॅबिनेट मंत्री दर्जा

खा. संजय पाटील यांना कॅबिनेट मंत्री दर्जा

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 13 2018 12:21AMसांगली : प्रतिनिधी

कृष्णा खोरे विकास  महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा निर्णय घेतला. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री. पाटील यांना ही भेट देण्यात आली. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळेल, असे मानले जाते. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची परिस्थिती आणि टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ योजनांची रखडलेल्या कामांना न्याय देण्यासाठी श्री. पाटील हे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. या योजना पूर्ण करण्यासाठी असणारी तळमळ आणि सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी मिळावा यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्याने पाणी योजनांसाठी मोठा निधीही मिळाला. टेंभू योजनेचा पंतप्रधान सिंचन योजनेतही समावेश झाला. याची दखल घेऊन  श्री. फडणवीस यांनी संजय पाटील यांना पाटील यांच्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती. दरम्यान, याच महामंडळावर उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची वर्णी लावली आहे. आता पाटील यांना ही जबाबदारी आणखी सक्षमपणे पेलण्यासाठी श्री. फडणवीस यांनी उपाध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला.