Sat, Nov 17, 2018 13:00होमपेज › Sangli › माझी जात शेतकरीच;मी कोणत्याही वादळाला भीत नाही : खासदार शेट्टी

माझी जात शेतकरीच;मी कोणत्याही वादळाला भीत नाही : खासदार शेट्टी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बोरगाव : वार्ताहर

माझी निवडणूक ही फक्त शेतकर्‍यांच्या जीवावर होत असते. त्यामुळे मी कोणत्याही वादळाला भीत नाही.  काही लोक आता जातीचा आधार घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी अपप्रचार करीत आहेत. पण माझी जात फक्त शेतकरीच आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

लवणमाची (ता. वाळवा) येथे खासदार निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. एस. यु. संदे, सयाजी मोरे,  बाजार समितीचे संचालक शिवाजीराव मोरे प्रमुख उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, लवणमाची व बेरडमाची या छोट्या गावांतूनही लोकसभा निवडणुकीत मला आघाडी मिळाली होती. या गावातील लोकांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
मधुकर डिसले यांनी प्रास्ताविक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, उपाध्यक्ष संतोष शेळके  व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags : MP Raju Shetty, sangli, sangli news


  •