Fri, Apr 26, 2019 16:11होमपेज › Sangli › डेप्युटी सीईओ यांच्या जाचातून मुक्त  करा

डेप्युटी सीईओ यांच्या जाचातून मुक्त  करा

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 8:48PM

बुकमार्क करा

तासगाव  : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी दडपशाहीच्या मार्गाने ग्रामसेवक संवर्ग अडचणीत आणला आहे. त्यांची तातडीने जिल्ह्याबाहेर बदली व्हावी, यासाठी आमच्या संघटनेने 8 डिसेंबरपासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देऊन रविकांत अडसूळ यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करावा. त्यांच्या जाचातून सर्व ग्रामसेवकांची मुक्तता करावी,   अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी निवेदनाद्वारे आमदार सुमन पाटील यांच्याकडे केली आहे.

आमदार सुमन पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक संवर्गावर दबावतंत्राचा वापर करत आहेत. संघटना मोडीत काढण्याचा त्यांचा डाव आहे. संवर्गाचे प्रश्न निकालात न काढता प्रलंबित ठेवत आहेत. शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसेवक संवर्गास लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत. तातडीने बदली न झाल्यास येत्या 15 तारखेला जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार आहे.