Thu, Jan 17, 2019 02:28होमपेज › Sangli › मोदींनी जनतेची दिशाभूल केली 

मोदींनी जनतेची दिशाभूल केली 

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 8:34PMकवठेपिरान : वार्ताहर 

स्वतःला देशाचे चौकीदार समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करीत आहेत? त्यांनी जनतेला फसविले आहे, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. कवठेपिरान येथील विकासकामाच्या उद्घाटन  समारंभात ते बोलत होते.  

स्थानिक निधीतून कवठेपिरान  येथील हाळभाग व स्मारक रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार पाटील यांनी हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी श्रीमती सोनाताई गायकवाड, माजी उपसभापती दत्ताअण्णा पाटील, तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,  संग्राम पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी  यांनी प्रभावी भाषणे करून लोकांना भुरळ घातली आहे. जनतेला फक्त स्वप्नेच दाखवून  भ्रमनिरास  केले आहे. येत्या अधिवेशनातही अशाच घोषणांचा पाऊस पाडला जाणार असून पुन्हा लोकांची दिशाभूल केली जाऊ शकते. विनोद वडगावे यांनी स्वागत केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.