Sun, Jul 21, 2019 10:38होमपेज › Sangli › कुंडल परिसरावर शोककळा, व्यवहार बंद

कुंडल परिसरावर शोककळा, व्यवहार बंद

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 11:19PMकुंडल : वार्ताहर

आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने कुंडल आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. कुंडल येथे डॉ. कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. कदम यांच्या निधनाचे वृत्त येताच कुंडल येथे  शोककळा पसरली. आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा कुंडलशी ऋणानुबंध होता. कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील  वसतिगृहात  राहुन डॉ. कदम यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. ते  कुंडल गावचे  जावई असल्याने त्यांचे या गावावर  प्रेम होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ.  कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  पंचायत समितीचे माजी सदस्य वसंतराव जाधव, नंदकुमार लाड, विश्वास जाधव, मामासाहेब पवार बँकेचे संचालक प्रशांत पवार, सर्जेराव पवार, यशवंत लाड, विष्णुपंत लाड, बी. आर. पवार, हिंमत पवार, बापूसाहेब पवार, कुंडलिक एडके, संजय गोरड, डॉ. योगेश लाड, बाळासाहेब विभुते, प्रभाकर विभुते, संदीप लाड व काँग्रेस  कार्यकर्ते  उपस्थित होते.