Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Sangli › महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम उतरणार : पिरजादे

महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम उतरणार : पिरजादे

Published On: May 05 2018 1:46AM | Last Updated: May 05 2018 1:44AMमिरज : शहर प्रतिनिधी 

ओवैसी यांचा एमआयएम पक्ष सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे. या निवडणुकीत ते 30  मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करणार आहेत. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एमआयएमने कधीच निवडणूक लढवली नाही. ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत मुस्लिमांबरोबर दलितांनाही उमेदवारी देण्यात येणार असल्याचे या पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी सांगितले.

ते म्हणाले, आमच्या पक्षाची यंदा ही पहिलीच निवडणूक आहे. मिरजमध्ये 12, सांगली व कुपवाडमध्ये 18 उमेदवार ते उभे करणार आहोत. या निवडणुकीसंदर्भात तसा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवला आहे. येत्या काही दिवसांत आदेश आल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. 

मिरजेतील प्रभाग क्रमांक 2, 3, 20 व सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 या प्रभागांमध्ये दलित समाजातील महिला व पुरुष इच्छुक आहेत. त्यांना तेथे उमेदवारी देण्याचा विचार आहे. शिवाय मिरजेतील 5 व 6 या प्रभागातही उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. येथे मुस्लिम समाजाचे उमेदवार असतील. 

एमआयएम या पक्षाकडून लढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवक इच्छुक आहेत. त्यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. या महापालिकेची एमआयएम लढवत असणारी ही पहिली निवडणूक असली तरीही यंदा जोरदार तयारी करण्यात येणार आहे. ओवेसी यांच्यासह पक्षातील आमदार व नेते प्रचार सभेला येणार आहेत. येत्या काही दिवसांत यावर रणनीती जाहीर करण्यात येईल.