Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Sangli › जनतेच्या सेवेसाठी आयुष्यभर कटिबध्द

जनतेच्या सेवेसाठी आयुष्यभर कटिबध्द

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 12:03AMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या   कार्यकर्तृत्वाचा वसा घेऊन मतदारसंघाची सेवा करण्यासाठी  अविरतपणे कार्यरत राहीन. तुम्ही माझे पालकत्व स्वीकारावे, मी मुलगा म्हणून या मतदारसंघाची आयुष्यभर सेवा करेन,  असे भावनिक आवाहन  महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्‍वजित कदम यांनी केले.पलूस -कडेगाव  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेले आमदार विश्‍वजित कदम यांचा आभार दौर्‍याचा सांगता समारंभ कडेगाव येथे झाला. यावेळी  आमदार विश्‍वजित कदम बोलत होते. यावेळी युवा नेते जितेश कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, ज्येष्ठ नेते गुलाम पाटील, सुरेश निर्मळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. म्हणाले की,  डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी त्यांच्या आयुष्यात  माणसे मिळवली. त्यांचे जेवढे मोठे कर्तृत्व होते तेवढेच मोठे व्यक्तिमत्व होते. कडेगाव शहराला सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. येथे शुद्ध पाणी पुरवठा व पायाभूत सुविधा आणि शहराचा विकास यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे डॉ.विश्‍वजित कदम यांनी सांगितले. यावेळी बाळकृष्ण यादव, सुरेश निर्मळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सरपंच विजय शिंदे यांनी केले.तर सूत्रसंचालन सागर सूर्यवंशी यांनी केले.यावेळी नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजिद पाटील, दिनकर जाधव, अविनाश जाधव, इंद्रजित साळुंखे, सत्यजित देशमुख, सुनील पवार, राजेंद्र राऊत, सुरेश देशमुख, वैभव देसाई, हैदर मुल्ला, सीराज पटेल, नासीर पटेल, असिफ तांबोळी   उपस्थित होते.