Sat, Nov 17, 2018 06:15होमपेज › Sangli › लॉजवर छापा; सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

लॉजवर छापा; सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील वखारभागातील एका लॉजवर छापा टाकून   हायप्रोफाईल सेक्सरॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना बुधवारी यश आले. या ठिकाणी असलेल्या तीन मुलींची सुटका करण्यात आली. त्याशिवाय यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज सलग दुसर्‍या दिवशी अशी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 

पोलिसांनी सांगितले की, शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणार्‍या वखारभागातील  एका लॉजमध्ये  वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना  मिळाली. त्यानुसार   स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख राजन माने यांच्या पथकाने या लॉजवर छापा टाकला. 

त्यावेळी लॉजमधील एका खोलीत तीन मुली त्यांना सापडल्या. त्यांची  सुटका करण्यात आली. त्या शिवाय दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. या संशयितांविरोधात अनैतिक मानवी व्यापार, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार  गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.