लॉकडाऊन स्पेशल ‘कस्तुरी क्लब टाईम’

Last Updated: Apr 22 2020 8:35AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नोकरदार निवांत झाले; पण घरातील महिलांची मात्र दगदग वाढली. नवरा, मुले सगळेच घरी असल्याने रोज नवीन मेजवानीची फर्माईश वाढली. हे सगळे करीत असताना आमच्या या कस्तुरींना स्वत:साठी काही वेळ मात्र मिळेना. तरीही आपल्या कुटुंबासाठी ती दिवस-रात्र कष्ट घेतच आहे. म्हणूनच दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने खास कस्तुरींसाठी 94.3 टोमॅटो एफ.एम.वर ‘लिपस्टिकवाले सपने’ या कार्यक्रमांतर्गत ‘कस्तुरी क्लब टाईम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या सर्व कस्तुरींसाठी मंगळवार व शुक्रवारी दुपारी 1 ते 2 या वेळेत हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 

टोमॅटो एफ.एम.वर बहारदार गाणी तर असणारच आहेत; पण ती कस्तुरी सभासदांच्या आठवणीतली, कस्तुरी सभासदांनी त्यांच्या आठवणीतले गाणे सांगून ते का आवडते आणि त्या गाण्याबरोबरचा त्यांचा अनुभव टोमॅटो एफ.एम.वर शेअर करायचा आहे. केवळ गाणेच नाही, तर कस्तुरी सभासदांनी त्यांच्या आठवणी, त्यांची फसलेली एखादी रेसिपी काय होती याच्या गमतीजमतीही सांगायच्या आहेत. याचबरोबर कस्तुरी सभासदांसाठी ठिपक्याच्या रांगोळीची स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. रांगोळी काढून त्या रांगोळीसोबतचा सेल्फी पाठवला, तर रांगोळी विजेत्या कस्तुरी सभासदांना एक आकर्षक गिफ्टही मिळणार आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही कस्तुरी क्लब आपल्या सभासदांसोबत असणार आहे. फक्‍त तुम्ही तुमची काळजी घ्या, घरी राहा आणि 94.3 टोमॅटो एफ.एम.ऐकत राहा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  9096853977, 8308706122 या नंबरवर संपर्क साधावा.