होमपेज › Sangli › सांडगेवाडीत पेट्रोल पंपावरून  लाखाच्या डिझेलची चोरी

सांडगेवाडीत पेट्रोल पंपावरून  लाखाच्या डिझेलची चोरी

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 07 2018 1:06AMपलूस : प्रतिनिधी   

सांडगेवाडी (ता. पलूस) येथील सिद्धिविनायक पेट्रोलपंपाच्या जमिनीत असलेल्या टाकीतून एक लाखांचे 1337 लिटर  डिझेल अज्ञातांनी चोरले आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. पेट्रोलपंपाच्या मालकांनी याबाबत  वरिष्ठांकडे दाद मागण्याचा इशारा दिल्यानंतर  गुरुवारी दुपारी पलूस पोलिसांनी ही फिर्याद नोंदवून घेतली.

या पंपावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे रात्री  रखवालदार नसतो. सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान सर्व कर्मचारी  काम संपवुन घरी गेले होते. मंगळवारी सकाळी  डिझेलच्या टाकीमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये मध्यरात्री टाकीकडे तोंड  असलेल्या कॅमेर्‍यावर   एकाने फडके  टाकले. चाळीस मिनीटानी ते फडके काढल्याचेही दिसून आले.

पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उदय पवार यांनी  पलूस पोलिसांशी संपर्क साधला.मात्र पोलिसांनी  ही चोरी तुमच्याच माहितीगार कर्मचार्‍यांनी केली असेल. कारण टाकीचे कुलूपही तुटलेले नाही. यात कर्मचारी सहभागी असतील. त्यामुळे तुमचीच चौकशी करावी लागेल, असे सांगत तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली होती.