Sat, Sep 22, 2018 03:38होमपेज › Sangli › बागणीत मोठा शस्त्रसाठा जप्त

बागणीत मोठा शस्त्रसाठा जप्त

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 11:47PMसांगली : बागणी (ता. वाळवा) येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 11 तलवारी, 9 कुकरी असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. 

इमामुद्दीन बाबालाल शिकलगार (वय 48, रा. मोमीन गल्ली, बागणी), हारूण हमीद शिकलगार (वय 37), शब्बीर नुरूद्दीन शिकलगार (वय 29) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी अवैध शस्त्रसाठा, तस्करी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.  शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना बागणी येथील दुधगाव रस्त्यावरील शिकलगार वस्तीवरील एका घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा केल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार पथकाने सोमवारी दुपारी शब्बीर शिकलगार याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर तेथे 11 तलवारी, 9 कुकरी सापडल्या. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, युवराज पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, सचिन कनप यांच्या पथकाने ही कारवाई केली.