Tue, Nov 13, 2018 10:37होमपेज › Sangli › खोटे प्रतिज्ञापत्र करून जमीन लुबाडली; कुटुंबीयांचे उपोषण

खोटे प्रतिज्ञापत्र करून जमीन लुबाडली

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:34PMसांगली : प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील तडसर येथील शेतजमिनीवर बेकायदेशीरपणे खोटे प्रतिज्ञापत्र करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. 

तडसर येथील उस्मानगणी मुलाणी हे मृत झालेले आहे. त्यांचे शमशुद्दीन, सिराज, जरीनाबी हे वारसदार आहेत. असे असतानाही     कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर आपण एकटेच वारसदार असल्याचे भासवून खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. उर्वरित तीन वारसदारांची नावे वगळून जमीन बळकावली आहे, अशी उपोषणकर्त्यांची तक्रार आहे. 

इकबाल मुल्ला,  दस्तगीर मुल्ला, रईसा मुल्ला, जब्बीन मुल्ला (सर्व रा. आष्टा) हे उपोषणास बसले आहेत. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.