Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Sangli › कुंडलमध्ये दराअभावी कलिंगड शेती तोट्यात

कुंडलमध्ये दराअभावी कलिंगड शेती तोट्यात

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 11:54PMकुंडल: वार्ताहर

पलूस तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दराअभावी कलिंगड शेती तोट्यात जात आहे.  
कलिंगडाची लागवड डिसेंबर ते मार्च महिन्यात सुरू होते. साधारणत: दोन महिन्यात उत्पादन देणारे पीक म्हणून कलिंगडकडे पाहिले जाते. त्यातून आर्थिक उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळते म्हणून पलूस तालुक्यात शेतकर्‍यांनी कलिंगडाची लागवड केली.  

कलिंगडाच्या रोप लागणीपासून दहा ते पंधरा दिवस या रोपांची चांगली निगा राखावी लागते. यासाठी शेतकर्‍यांनी अहोरात्र कष्ट घेतले.  कलिंगडाच्या लागवडीपासून औषध फवारणी, मजुरी खतांसह एकरी सुमारे  70 ते 90 हजार रुपये खर्च दोन महिन्यांत येतो. अवघ्या दोन महिन्यात भरघोस उत्पन्न देणारे पीक म्हणून कलिंगड पिकाकडे पाहिले जाते. 
ऐन उन्हाळ्यात कलिंगडाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतकर्‍यांना तोट्यात कलिंगडाची विक्री करावी लागत आहे. कलिंगडाचे एकरी सुमारे 20 ते 25 टन उत्पादन निघते. बाजारपेठेत

सध्या सरासरी 3 ते 5 रुपये किलेा दराने कलिंगड विक्री होत आहे. त्यातून शेतकर्‍यांना एकरी सरासरी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
उत्पादन खर्च वजा करून शेतकर्‍यांना एकरी फक्त 20 ते 25 हजार रुपये शिल्लक रहात आहेत. ऐन उन्हाळ्यात शेतकरी कलिंगडाच्या उत्पादनातून गारवा देतोय पण तुटपुंज्या उत्पादनातून स्वत: रात्रंदिवस तापतच राहतोय, अशी परिस्थिती शेतकरी वर्गाची झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Tags :Kalingaad farming , drop in price, sangli news