Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Sangli › ग्रामपंचायतींकडून ‘एलईडी पथदिवे’ निविदात घोळ

ग्रामपंचायतींकडून ‘एलईडी पथदिवे’ निविदात घोळ

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

एलईडी पथदिव्यांसाठी ग्रामपंचायतींनी काढलेल्या ई-निविदांमध्ये घोळ आहे. काही ठराविक पुरवठादारांना ठेका देता यावा या उद्देशाने अटी, शर्ती घातल्या आहेत. सॅम्पल प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र सरपंच/ग्रामसेवकांकडून घेणे ही अट वादग्रस्त आहे. या निविदा थांबवाव्यात व नव्याने ई-निविदा काढाव्यात, अशी मागणी जयंत माने, के. एन. जाधव  या पुरवठादारांनी केली आहे. 

जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी यापूर्वी खरेदी केलेल्या एलईडी पथदिव्यांमध्ये अनियमितता झाली आहे. जादा दराने खरेदीचे प्रकार घडले आहेत. दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण अजून ताजे असताना ग्रामपंचायतींकडून पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र नुकतेच काही ग्रामपंचायतींनी एलईडी पथदिवे पुरवठा व आस्थापित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. त्या सदोष असल्याचे माने व जाधव यांनी सांगितले. 

माने म्हणाले, आटपाडी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने 11 लाख 13 हजार रुपयांच्या एलईडी पथदिव्यांसाठी ई-निविदा काढली आहे. मागील दोन वर्षात स्थानिक ग्रामपंचायतींना एलईडी पुरवठा केलेल्या ग्रामपंचायतीच्या कामाच्या आदेशाची प्रत जोडणे अनिवार्य केले आहे. ही अट म्हणजे जुन्या पुरवठादारांनाच संधी देण्याचा प्रकार आहे. नवीन पुरवठादारांना संधी नाकारण्याचे कारण काय? पुरवठा करण्यात  येणार्‍या एलईडी दिव्यांचे सॅम्पल सरपंच/ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून प्रमाणित असल्याबाबतचे पत्रही अनिवार्य केले आहे. ते अतिशय चुकीचे असून हस्तक्षेप वाढणार आहे. लघु व मध्यम उद्योजक उत्पादकाचे पत्र ही अटही अवाजवी आहे. जिल्ह्यात अन्य काही ग्रामपंचायतींनीही ई-टेंडरमध्ये अशाच अटी, शर्ती घातल्या आहेत. 

Tags : sangli, sangli news, LED street light, tendering, jumble, Gram Panchayat,