Thu, Jul 18, 2019 02:08होमपेज › Sangli › कुपवाड पोलिसांची युवकास अमानुष मारहाण

कुपवाड पोलिसांची युवकास अमानुष मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुपवाड : वार्ताहर 

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या गणेश व सुहास दशरथ गंभीरे (वय 22,रा.रामकृष्ण नगर, कुपवाड.) या दोघा बंधुना सहाय्यक पोलिस निरीक्षकासह अन्य चार पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जखमीवर सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीने पोलिस उपाधिक्षक डॉ.धीरज पाटील यांची भेट घेतली. डॉ.पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून कुपवाड पोलिसांनी या घटनेचा इन्कार केला आहे. 
याबाबत मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.धीरज पाटील यांना जखमी गणेश गंभीरे यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की,माझा भाऊ सुहास हा मंगळवारी कुपवाडमधील नागराज खानावळीत जेवणाचे पैसे देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पैसे देवाणघेवाणीच्या कारणावरून खानावळ मालक दिनेश (पूर्ण नाव नाही)यांच्याशी वादावादी झाली. यावेळी खानावळ मालकाने सुहासला मारहाण केली. त्यानंतर मी व सुहास दोघे मिळून मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कुपवाड पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक भारत शिंदे यांनी मारहाणीची घटना सविस्तर सांगितली. त्यावेळी तेथे खानावळ मालकाच्या सांगण्यावरून मला व भावाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्याच्या मारहाणीत माझा उजवा पाय मोडला आहे. तसेच आमच्या दोघांच्या पाठीवर मारहाणीचे वळ उठलेले आहेत. 

या गंभीर मारहाणीनंतर गणेश यांच्यावर सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी सतीश साखळकर, अश्रफ वांकर, अमर पडळकर, महेश खराडे, आसिफ बावा यांच्यासह अनेकांनी मिरजेचे उपविभागीय अधिकारी डॉ.धीरज पाटील यांची भेट घेतली.डॉ.पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलिसांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. 

दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक भारत शिंदे म्हणाले, गणेश गंभीरे यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात चार ते पाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खानावळ मालक व गंभीरे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार गंभीरे विरोधात 151 अंतर्गत कारवाई केलेली होती. त्याच्या पायाला जी दुखापत झाली आहे. ती खानावळ मालक व त्याच्यात झालेल्या मारहाणी वेळी झालेली आहे.   


  •