Thu, Jul 18, 2019 11:03होमपेज › Sangli › कुपवाड एमआयडीसीतील सांडपाणी प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होणार

कुपवाड एमआयडीसीतील सांडपाणी प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण होणार

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 11:50PM

बुकमार्क करा

कुपवाड : वार्ताहर 

कुपवाड एमआयडीसीतील सांडपाणी प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनाने पुण्यातील एका कंपनीची निवड केली आहे. हा प्रकल्प मे 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील यांनी दिली. 

सांगलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे पदाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस. बी. पाटील, पुण्याचे अधीक्षक अभियंता एस. ए. दराडे, सांगलीचे कार्यकारी अभियंता एस. एस. कुर्‍हाडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील, अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक एस. बी. सूर्यवंशी उपस्थित होते. 
कुपवाड  औद्योगिक वसाहतमधील सांडपाणी प्रकल्पाच्या विरोधात सावळी ग्रामपंचायत न्यायालयात गेल्याचे कारण सांगून तत्कालीन दोन संस्थेने हा प्रकल्प अर्धवट ठेवलेला होता.

हा प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा यासाठी कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील, विद्यमान अध्यक्ष सतीश मालू आदींनी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता. हा प्रकल्प सुरू झाल्यावर कुपवाड एमआयडीसीतील सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे, असे मुख्य कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.