Mon, Jun 17, 2019 14:44होमपेज › Sangli › कुपवाड शहराची अवस्था खेड्यासारखी

कुपवाड शहराची अवस्था खेड्यासारखी

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:18PMकुपवाड : श्रीकांत मोरे 

कुपवाड ग्रामपंचायतीची नगरपरिषद होऊन व नंतर  महापालिकेत समावेश होऊन वीस वर्षापेक्षा जादा कालावधी होऊनही कुपवाड शहराची अवस्था आजही खेड्यासारखीच आहे. कुपवाड गावठाणासह उपनगरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या आजही जैसे थे आहेत. त्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने मार्गी लावून जनतेचे हीत जोपासणारा नगरसेवक पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

कुपवाड शहर प्रभाग दोन मधील गावठाणासह, गुंठेवारी, उपनगरातील समस्या जैसे थे आहेत. तत्कालीन कुपवाड ग्रामपंचायतीचा नगरपरिषेत व महापालिकेत समावेश झाला.  त्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा मिळण्यापेक्षा विविध कराच्या बोजाचा भुर्दड सहन करावा लागत आहे. सांगली, मिरजेपेक्षा कुपवाडमधून दरवर्षी महापालिकेला मिळणार्‍या महसुलाचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे. तरीही महापालिका प्रशासनाकडून कुपवाडपेक्षा सांगली मिरजेला जादा निधी दिला जातो. 

कुपवाड शहरात समस्यांचा डोंगर उभा आहे. सांगली, मिरजेत महापालिकेच्यावतीने दवाखाना चालविला जातो. परंतु कुपवाडला अद्यापही सर्व सुविधायुक्त दवाखाना नाही. त्यामुळे नागरिकांना सांगली मिरजेला व महागड्या दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. शहरात वृध्द व बालकांसाठी उद्याने नाहीत. तसेच क्रीडा खेळाडूंच्यासाठी उत्तम मैदान नाही. शहरात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे या भागाचे चित्र आहे.

समस्या प्रभागाच्या 4

परिसर  : कुपवाड  मूळ गावठाण, लिंगायत गल्ली, शांतकॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, माळवाडी, लेप्रसी कॉलनी, मेघजीभाईवाडी, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय परिसर, नवनाथनगर, मिरज- पंढरपूर रस्ता पश्चिम बाजू.