Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Sangli › कुपवाडमधील चोरी प्रकरणातील दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कुपवाडमधील चोरी प्रकरणातील दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 11:17PMकुपवाड : वार्ताहर 

कुपवाड एमआयडीसीतील अजित बापूसाहेब किणीकर ( वय 79, रा. गुलमोहोर कॉलनी सांगली ) यांच्यासह भागीदारीत असलेल्या लक्ष्मीनारायण टेक्स्टाईल मिलमधील चोरी प्रकरणातील साडेनऊ लाखांचा मुद्देमाल बुधवारी पोलिसांनी जप्त केला आहे, अशी  माहिती सहाय्यक निरीक्षक रूपाली कावडे यांनी पत्रकारांना दिली. 

संशयित बंटीसिंग चंदेल याने लक्ष्मीनारायण टेक्स्टाईल मिलमध्ये 2 मार्चच्या मध्यरात्री घुसून मिलमधील साडेनऊ लाखांची महागडी इलेक्ट्रॉनिक पॅनेलची चोरी केलेला मुद्देमाल इचलकरंजी येथील एका मित्राच्या खोलीत ठेवला असल्याची कबुली कुपवाड पोलिसांना दिली. त्यानुसार बुधवारी सहाय्यक निरीक्षक रूपाली कावडे, हवालदार प्रवीण यादव, नितीन कुरणे, रमेश जाधव, कृष्णा गोजारी, नितीन मोरे यांनी संशयित चंदेल याला घेऊन इचलकरंजीत ठेवलेला चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला. 

संशयित चंदेल याने  दि. 27 फेब्रुवारीरोजी कंपनी बंद असताना पाहणी करून गेल्याची तक्रार कंपनीचे मालक अजित किणीकर यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन मंगळवारी अटक केली होती.