Fri, Apr 19, 2019 12:42होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

कुपवाडमध्ये चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला

Published On: Dec 23 2017 2:11AM | Last Updated: Dec 22 2017 9:18PM

बुकमार्क करा

कुपवाड : वार्ताहर

कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कोल्ड स्टोअरेजसमोर चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांकडून पकडण्यात  आला.  ही वाळू सिध्दापूर (ता. मंगळवेढा) येथून आणण्यात आली होती. या प्रकरणी ट्रक व पाच ब्रास वाळू असा साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक विष्णूदेव तुकाराम बजबळकर (रा. तिप्पेहाळी, ता. सांगोला) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रकचालक बजबळकर व मालक अक्षय केदार (रा. सांगोला) या दोघाजणांनी सिध्दापूर येथील ओढ्यातून आणलेली वाळू गुरुवारी विक्रीसाठी कुपवाडला आणत होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून औद्योगिक वसाहतीमधील एका कोल्ड स्टोअरेजसमोर ही चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये पाच ब्रास वाळू भरली  होती.  पोलिस कॉन्स्टेबल गणपत शेखरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून ट्रक व वाळू असा साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकचालक बजबळकर व मालक अक्षय केदार या  जणाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रकचालक बजबळकर यास ताब्यात घेतले आहे. हवालदार प्रवीण यादव तपास करीत आहेत. वाळू चोरीबाबतच्या घटना अलिकडे वारंवार आढळून येऊ लागलेल्या आहेत.