Wed, Feb 20, 2019 13:12होमपेज › Sangli › कुपवाड : ३३ लाखांच्या बेकायदा डिझेल साठ्‍यासह दोघांना अटक 

कुपवाड : ३३ लाखांच्या बेकायदा डिझेल साठ्‍यासह दोघांना अटक 

Published On: Apr 24 2018 4:34PM | Last Updated: Apr 24 2018 4:34PMकुपवाड : वार्ताहर 

मिरज एमआयडीसी समोरील दुर्गानगर झोपडपट्टीजवळील एका कॉलनीत बेकायदेशीर डिझेल साठ्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकून अंदाजे 33 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघ  संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरज पाटील यांना माहिती मिळाली की, मिरज एमआयडीसी समोरील दुर्गानगर झोपडपट्टीजवळील एका कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीररित्‍या डिझेलचा साठा केला जात आहे. त्यानुसार डॉ.पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांना सदर बेकायदेशीर डिझेल साठ्यावर छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव,विश्वास वाघ,रमेश जाधव, कृष्णा गोजारी यांनी या साठ्यावर छापा मारून 33 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणातील दोन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.