Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › कृष्णा खोरे महामंडळ शेती, शेतकर्‍यांच्या विकासासाठीच

कृष्णा खोरे महामंडळ शेती, शेतकर्‍यांच्या विकासासाठीच

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 11:19PMसांगली : प्रतिनिधी

कृष्णा खोरे महामंडळ शेती आणि शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. याचे भान ठेवून अभियंत्यांनी कामे करावीत.  नाविन्यपूर्ण कल्पना राबवून गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर  द्यावा असे आवाहन कृष्णा खोरे महामंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी व्यक्‍त केले. मुंबईत सिंचन भवन येथे शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर आढावा बैठकीत ते बोलत होते.  महामंडळाचे कार्यकारी संचालक के. एच. अन्सारी, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, व्ही. जी. राजपूत, सौ. व्ही. ए. अंकुश, तसेच महामंडळाच्या अखत्यारीतील विविध प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, सर्व खात्यांचे प्रमुख आदि  उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, शेतीला पाणी वेळेवर उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. बिले, थकबाकी आणि त्याची वसुली हा भाग निराळा आहे. त्यामुळे पाणीवाटप आणि करवसुली यासाठी तलाठी, ग्रामसेवक आदिंना बरोबर घेऊन नियोजन करावे.ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यास मी आहेच. पाण्याच्या मुद्यावर कोणी राजकरण करीत असल्यास यापुझे पुढे खपवून घेतले जाणार नाही.
ते म्हणाले, जिल्हा व प्रकल्प निहाय कामकाजाचा आढावा घेऊ. महामंडळातर्फे  लवकरच जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर एक विस्तृत आराखडा सादर करणार आहे.