Sat, Sep 22, 2018 22:20



होमपेज › Sangli › ‘कोयना’ @42.88

‘कोयना’ @42.88

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:40PM



पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर तिसर्‍या दिवशीही कायम आहे. त्यामुळेच धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पाणी साठा 42.88 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस रविवारी कायम राहिला होता. या पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठा 37.88 टीएमसी इतका आहे. धरणातील पाणी उंची 2098.8 फूट, जलपातळी 639.674  मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 1660 मि. मी., नवजा 1526 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 1363 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत धरणात एकूण 16.95 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.  दरम्यान पाटण तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. ग्रामीण विभागातील छोट्या नद्या व ओढ्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.