Thu, Mar 21, 2019 23:43
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › कोयना, चांदोली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्‍का 

कोयना, चांदोली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्‍का 

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:34PMवारणावती/पाटण : वार्ताहर 

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसर मंगळवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. पहाटे  1 वाजून 43 मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाची तीव्रता वारणावती येथील भूकंपमापन केंद्रावर 3.1 रिश्टर स्केल  इतकी नोंदली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर होता.

कोयना धरण परिसरात सोमवारी मध्यरात्री 1.43 मिनिटांनी 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावच्या नैर्ऋत्तेस 9 कि. मी. अंतरावर होता. 

भूकंपाची खोली 7 कि. मी. अंतरावर होती. हा भूकंप कोयना, अलोरे, चिपळूण, पाटण आदी विभागात जाणवला. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे. मध्यरात्री हा भूकंप जाणवल्याने अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पळत सुटले. शिराळा तालुक्यात या भूकंपाने कोठेही जीवित व वित्तहानी झाली नाही.