होमपेज › Sangli › कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जूनपासून सुरू

कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस १३ जूनपासून सुरू

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:23PMमिरज : प्रतिनिधी

कोल्हापूर-बिदर साप्ताहिक एक्स्प्रेस (11415/11416) दि. 13 जूनपासून सुरू होणार आहे. प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापूर येथून सुटून दुसर्‍या दिवशी गुरुवारी बिदर येथे सकाळी 10.15 वाजता पोहोचेल. बिदर येथून कोल्हापूरसाठी ही गाडी गुरुवारी दुपारी 11.45 वाजता निघून शुक्रवारी मध्यरात्री 12.35 वाजता कोल्हापूर  येथे येईल. 

या गाडीस भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि  मिरज येथे थांबा देण्यात आला आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस कोल्हापूर-नागपूर धावणारी एक्स्प्रेस बिदरसाठी आठवड्यातून एकदा सोडण्यात येणार आहे.