Thu, Aug 22, 2019 04:04होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये पिता-पुत्रांवर खुनी हल्‍ला

इस्लामपूरमध्ये पिता-पुत्रांवर खुनी हल्‍ला

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:49PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

पैसे देत नसल्याच्या कारणावरून पिता-पुत्रांवर तलवारी आणि दांडक्याने खुनी हल्‍ला करण्यात आला. हा  प्रकार मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास निनाईनगर परिसरात घडला. नागू राघू  कदम (वय 58), तानाजी नागू कदम (वय 29, रा. निनाईनगर, इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत.याप्रकरणी चार संशयितांवर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. संतोष रखमाजी कदम, रखमाजी सखाराम कदम, वसंत दगडू कदम, दिनेश आनंदा पाटील (रा. निनाईनगर, इस्लामपूर) अशी संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  तानाजी कदम हे निनाईनगर येथे राहतात. ते शेतमजुरीची कामे करतात. दोन वर्षांपूर्वी गल्लीत राहणार्‍या  संतोष कदम याच्याबरोबर किरकोळ कारणावरून तानाजी याचा वाद झाला होता.  तडजोडीनंतर तो वाद मिटला होता. मंगळवारी सायंकाळी  तानाजी, नागू हे पिता-पुत्र मोटारसायकल (एम.एच.10/बीसी-0769) ने शेतातून घरी जात होते. रस्त्यात चुलतभाऊ भेटल्याने तानाजी यांनी मोटारसायकल थांबविली. ते बोलत थांबले. नागू हे घराकडे जातो, असे सांगून निघाले. 

त्यानंतर संतोष, दिनेश हे मोटारसायकलवरून तिथे आले. संतोष याने ‘तू मला आत्ताच्या आत्ता 50 हजार रुपये दे’ असे म्हणत शिवीगाळ केली. तानाजी याने, ‘मी गरीब आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. तुला कशाचे पैसे द्यायचे आहेत?’ असे विचारले. त्यानंतर संतोष, दिनेश मोटारसायकलवरून निघून गेले. 

तानाजी  घराकडे निघाले. संतोष, रखमाजी, दिनेश, वसंत यांनी तानाजी यांची मोटारसायकल रस्त्यात अडवून त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. जीवे मारण्याची धमकी दिली. शेजारच्या खोलीतून  संतोष, दिनेश हे हातात तलवार घेऊन आले. रखमाजी, वसंत यांनी हातातील दांडक्याने तानाजी यांच्या मांडीवर, खांद्यावर कमरेवर जोराने मारहाण केली. आरडाओरडा ऐकून नागू हे मुलाला सोडविण्यासाठी तिथे आले. संतोष याने तलवारीने नागू यांच्या कपाळावर वार केला. ते जमिनीवर कोसळले. लोक जमा झाले. त्यानंतर हल्‍लेखोर  पळून गेले. नागू यांच्या कपाळाला   मोठी जखम झाली आहे. तानाजी यांनाही जबर मारहाण झाल्याने दोघांना सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तानाजी कदम यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

संशयितांवर खंडणीचा गुन्हा...

तानाजी यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तानाजी, नागू यांच्यावर  हल्‍ला केला. संशयितांवर खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.