Tue, Apr 23, 2019 07:50होमपेज › Sangli › खामकरने मिरजेतील एकास दिल्या होत्या बनावट नोटा

खामकरने मिरजेतील एकास दिल्या होत्या बनावट नोटा

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:52PMमिरज : शहर प्रतिनिधी

बनावट नोटाप्रकरणी साताराच्या शुभम खामकर याला गुरुवारी मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. त्याने मिरजेतील गौस मोमीन याला पाचशे व दोन हजार रुपयांच्या 21 बनावट नोटा दिल्याचे मोमीन याने सांगितले होते.  मोमीन याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्याच्याजवळ पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या. त्या नोटा खपविण्यासाठी खामकर याने गौस याला दिल्या होत्या, असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे छापा टाकून खामकरला ताब्यात घेतले होते. त्याला आज अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. यापूर्वी गौस याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे गौस व खामकर या दोघांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी मिरज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी त्या दोघांचीही आज कसून चौकशी केली. मिरजेत बनावट नोटा सापडल्यानंतर त्याचे सातारा कनेक्शन पुढे आल्याने तेथेही पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. मात्र मिरजेत सापडलेल्या बनावट नोटांचे कनेक्शन हे सातारा पोलिसांनी उघड केलेल्या बनावट नोटांशी आहे, की नाही ते अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र बनावट नोटा प्रक़रणी सातारा पोलिसांनी जप्त केलेले नोटा छपाईचे मशीन आम्ही तपासासाठी ताब्यात घेऊ असे मिरज महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कांबळे यांनी सांगितले.    .