Mon, Sep 24, 2018 09:06होमपेज › Sangli › कवठेमहाकाळ : दूध बंद आंदोलनास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

कवठेमहाकाळ : दूध बंद आंदोलनास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

Published On: Jul 17 2018 4:22PM | Last Updated: Jul 17 2018 4:22PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

तालुक्यात दुसऱ्या दिवशीही दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांशी दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी शाळांमध्ये दुधाचे वाटप करण्यात आले, तर चोरी-छुपके संकलन करणाऱ्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. आजही सुमारे 75 ते 80 हजार लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले.

दूध दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बंदमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशिंग येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले.

स्वाभिमानीचे कार्यकर्ते सुरज पाटील, शिवाजी पाटील, शंकर लंगोटे यांनी तालुक्यातील विविध दूध संकलकांना निवेदन देऊन दूध बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आज दुसऱ्या दिवशी काही संकलकांनी चोरी-चोरी संकलन करण्याचा प्रयत्न केला. त्याकडे आता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.