Fri, Apr 19, 2019 12:01होमपेज › Sangli › महांकाली कारखान्यावर स्वाभिमानीचा मोर्चा

महांकाली कारखान्यावर स्वाभिमानीचा मोर्चा

Published On: Sep 02 2018 1:17AM | Last Updated: Sep 01 2018 11:25PMकवठेमहांकाळ : प्रतिनिधी

थकीत ऊस बिलासाठी महांकाली साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. 
दि. 20 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकर्‍यांची ऊस बिल दिली जातील, असे पत्र कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी दिले. बिले न दिल्यास दि. 26 सप्टेंबरपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला.

मोर्चाला प्रारंभ तहसीलदार कार्यालयापासून करण्यात आला.  खराडे म्हणाले, संघटनेने दि.14 जून रोजी बिलासाठी  मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी 2017-18 या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचे केवळ 1200 रुपये प्रमाणे बिल देण्यात आले. उर्वरित बिल अद्याप दिलेले नाही. शेतकर्‍यांनी किती दिवस हा अन्याय सहन करायचा?  संजय खोलकुंबे, भरत चौगुले, सूरज पाटील, जोतीराम जाधव,  शिवाजी पाटील, शंकर लंगोटे, विराट पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुखदेव चव्हाण, मानसिंग कदम, श्रेणीक पाटील, गोमेटेश पाटील, 
दर्‍याप्पा पुजारी, श्रीनिवास जाधव, प्रीतम पाटील, महेश जगताप, सुरेश वसगडे, सूरज शेख, पंकज शिंदे, सुदर्शन वाडकर, सतीश पाटील, उमेश मुळे,  वैभव पाटील, प्रमोद ढेरे, सुखदेव चव्हाण उपस्थित होते.