होमपेज › Sangli › दुधगावात पाणंद रस्ते मुक्त करू : ना. सदाभाऊ खोत 

दुधगावात पाणंद रस्ते मुक्त करू : ना. सदाभाऊ खोत 

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 11:10PM

बुकमार्क करा

कवठेपिरान : वार्ताहर 

दुधगावातील पाणंद रस्ते मुक्त करणार, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात केली. सरपंच विकास कदम यांनी स्वागत केले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी अडचणी मांडल्या. यामध्ये नळ कनेक्शन,  लाईट कनेक्शन,  वारस नोंदी यांचा समावेश होता. ग्रामस्थांच्या प्रश्नांचा निपटारा  करण्याचे आदेश  आदेश ना. खोत यांनी दिले. यामध्ये प्रामुख्याने ज्यांची वारसनोंद किंवा संमतीने खातेफोड करावयाची आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून तलाठी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन केले.

सर्कल, तलाठी, तहसीलदार यांनी धान्य मिळणार्‍या व न मिळणार्‍या सर्वांची यादी तत्काळ करावी, असे आदेश दिले. ग्रामपंचायतीमध्ये लाभार्थ्यांची यादी तत्काळ लावण्याची सूचना केली. गावातील खण मुजवून तिथे क्रीडांगण व्हावे, अशी मागणी करण्यात आली. यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन तो प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सागर खोत, जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, तहसीलदार गणेश शेवाळे, गटविकास अधिकारी रोकडे, तालुका कृषी अधिकारी मेडीदार, पुरवठा अधिकारी अर्चना पाटील, सरपंच विकास कदम, अरूण जाधव उपस्थित होते.