होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित ‘वर्षासहल’

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आयोजित ‘वर्षासहल’

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 8:06PM



सांगली : पावसाळ्याची सुरुवात झाली की, निसर्गाची मुक्‍त उधळण, कडेकपारीमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना साद घालत असतात. म्हणूनच दै. पुढारी ‘कस्तुरी क्‍लब’ तर्फे  पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा राधानगरी तालुक्यातील ‘राऊतवाडी’ धबधबा या ठिकाणी वर्षासहलीचे आयोजन केले आहे. 200 फुटावरून वाहणारा राऊतवाडीचा हा धबधबा हे या सहलीचे आकर्षण आहे. कस्तुरी क्‍लबतर्फे या एक दिवसीय वर्षा सहलीचे आयोजन  जुलैमध्ये केले आहे. सहलीसाठी कस्तुरी क्‍लब सभासदांना प्रत्येकी फक्‍त 700 रुपये व जे सभासद नाहीत त्यांनी प्रत्येकी  800 रुपये शुल्क भरावयाचे आहे. सहलीचा प्रवास खर्च व सहली दरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, बिस्किटे हे सर्व कस्तुरी क्‍लबमार्फत देण्यात येणार आहे.  हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात राऊतवाडीचा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सभासदांनी कस्तुरी क्‍लब आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे. 

सभासदांनी दि. 10 जुलै 2018 पर्यंत आपली नावे पुढारी कार्यालय, जिल्हा परिषद समोर, सांगली-मिरज  रोड, सांगली येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी फोन 
नं.  ऑफीस- 0233-6729999, मोबा.- 7385816979