Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 7:27PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आणि राजपूत शैक्षणिक संकुलातर्फे  दहावीतील गुणवान विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा गौरव करण्यात आला. प्रा. डी. जी. बरगे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख  प्राचार्य एम. एस. राजपूत, दै. पुढारीच्या सांगली आवृत्तीचे वृत्तसंपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.  ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा’ या विषयावर प्राचार्य राजपूत यांचे व्याख्यान झाले. ते  म्हणाले, आताचे पालक शिक्षणाबाबत फारच दक्ष झाले आहेत. त्यामुळे ते पाल्य लहान असल्यापासूनच त्याच्या पाठीमागे लागतात. आपल्या पाल्याने केवळ जास्त पैसा कमवावा यासाठीच शिक्षण घ्यावे, असे अनेक पालकांना वाटते. 

प्रा. राजपूत म्हणाले, पाल्यांना पुरेसा मोकळेपणा दिला जात नाही. त्यांना मनमोकळेपणाने खेळायची संधीही मिळत नाही.  त्यामुळे त्यांचा अपेक्षित व्यक्तिमत्व  विकास होत नाही. त्याऐवजी पालकांनी त्यांचे सुप्तगुण ओळखून सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचे मित्र होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. प्रा. राजपूत म्हणाले, आपला पाल्य जसे आहे तसे त्यांचा स्वीकारा करायला हवा. त्यांची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यांना ज्या क्षेत्रात आनंद मिळतो, त्या क्षेत्रात उत्तम होण्यासाठी प्रोत्साहन द्या. दहावीची परीक्षा ही मेमरी टेस्ट तर बारावीची परीक्षा टॅलेंट टेस्ट करणारी आहे.