Mon, Apr 22, 2019 06:03



होमपेज › Sangli › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व लकी ड्रॉ

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व लकी ड्रॉ

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 8:24PM



सांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व राजपूत शैक्षणिक संकुल यांच्या विद्यमाने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. 8) रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे.दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कौतुकाने पाठ थोपटावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 85 टक्केपेक्षा जादा  गुण मिळाले आहेत. त्यांनी पुढारी ऑफिसमध्ये येऊन नावनोंदणी करावी. सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स पत्र आणावी. प्रथम येणार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यासोबत राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख  प्राचार्य एम. एस. राजपूत यांचे ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा’ हे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : तनीम - 7385816979 ठिकाण : राजपूत शैक्षणिक संकुल, व्हॉईट हाऊस, रिलायन्स मार्केट समोर, सांगली.

कस्तुरी सभासदांसाठी लकी ड्रॉ

कस्तुरी क्‍लब सभासदांना वर्षाअखेर वेध लागलेले असते ते म्हणजे ‘लकी ड्रॉ’ चे. हा ‘लकी ड्रॉ’ पण याच दिवशी काढण्यात येणार आहे. तरी सर्व कस्तुरी सभासदांनी उपस्थित रहावे. (ज्यांनी हे लकी ड्रॉ कुपन जमा केेले नाहीत त्या महिला कार्यक्रमादिवशी कुपन जमा करू शकतात.