Tue, Nov 20, 2018 03:33



होमपेज › Sangli › दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, लकी ड्रॉ

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, लकी ड्रॉ

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 8:29PM



सांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या वतीने  दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. 8) रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला  आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कौतुकाने पाठ थोपटावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे होणार आहे. 85 टक्केपेक्षा जादा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दै. पुढारी ऑफिसमध्ये गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रतिसह नावनोंदणी करावी. प्रथम येणार्‍यांना प्राधान्य देण्यात येईल. नावनोंदणी 7 जुलैपर्यंत सुरू आहे. या सत्कार समारंभासाठी राजपूत शैक्षणिक संकुल यांचे विशेष सहकार्य लाभलेआहे. दरम्यान, यावेळी राजपूत शैक्षणिक संकुलाचे कुटुंबप्रमुख  प्राचार्य एम. एस. राजपूत यांचे ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले  आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :  तनीम - 7385816979, ठिकाण : राजपूत शैक्षणिक संकुल, व्हॉईट हाऊस, रिलायन्स मार्केट समोर, सांगली.

कस्तुरी सभासदांसाठी भव्य लकी ड्रॉ

कस्तुरी क्‍लब सभासदांना वर्षाअखेर वेध लागलेले असते ते म्हणजे ‘लकी ड्रॉ’ चे. हा ‘लकी ड्रॉ’ पण याच दिवशी काढण्यात येणार आहे. तरी सर्व कस्तुरी सभासदांनी उपस्थित रहावे. (ज्यांनी हे लकी ड्रॉ कुपन जमा केेले नाहीत त्या महिला कार्यक्रमादिवशी कुपन जमा करू शकतात.)