Mon, Aug 19, 2019 11:22होमपेज › Sangli › ‘कस्तुरी’च्या ब्युटी पार्लर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘कस्तुरी’च्या ब्युटी पार्लर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jan 01 2018 2:08AM | Last Updated: Dec 31 2017 10:13PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने    येथील जय हनुमान पतसंस्थेच्या कुसुमताई राजारामबापू पाटील सभागृहात आणि आष्टा येथे लांडे कॉम्प्लेक्समध्ये ब्युटी पार्लर वर्कशॉप पार पडले. त्यांना कस्तुरी सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला. 

लक्ष्मी ब्युटी कलेक्शनच्या प्रिया पाटील प्रायोजक होत्या. अरोमा ट्रेझर कंपनीतज्ञ अनिता पराडकर (मुंबई) यांनी हेअर स्पा, पर्सनल केअर, त्वचेसंबंधी माहिती व केसांची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केलेे. ऋचा शिंदे यांनी हेअर स्पा व हेअर स्टाईलचे प्रात्यक्षिक करून दाखविले.  महिलांना पार्लर वर्कशॉपच्या मराठीतील नोटस् दिल्या. 

इस्लामपूर येथे डॉ. वर्षा पाटील प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. ज्योत्स्ना अहिर, राधिका कोरे, सिमरन मुलाणी, सविता साळुंखे, सुनिता मुळीक या विजेत्या ठरल्या. आष्टा येथे श्रद्धा लांडे प्रमुख पाहुण्या होत्या. नगराध्यक्षा स्नेहा माळी,  माजी नगराध्यक्षा झीनत आत्तार यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. मंदाकिनी यादव, वैशाली डफळे, सीमा वाडकर, प्रतिभा माळी, अंजली मस्के  विजेत्या ठरल्या. 

सुजाता पाटील, सारिका जाधव, चारुशीला फल्ले, सुरेखा गायकवाड, ज्योती शिंदे, आसिफा बागवान, नम्रता जाधव, सोनाली शिंदे, सरिता माने, राधिका चौगुले, सुनिता घोरपडे, वैशाली साळुंखे यांचे सहकार्य लाभले. कस्तुरी सभासदांची नाव नोंदणी सुरू आहे. 500 रूपये कस्तुरी नोंदणी फी भरल्यानंतर महिलांना लगेच 6 हजारांचे कुपन्स व लिडची नॉनस्टीक कढई दिली जाणार आहे.  वर्षभरामध्ये होणार्‍या कार्यक्रमामध्ये कस्तुरी सभासदांना सर्व वर्कशॉपमध्ये भाग घेता येईल.   कस्तुरी क्‍लबची सभासद व्हा व वर्षभरात होणार्‍या कार्यक्रमांचा आनंद घ्या, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंगल देसावळे- 8830604322 तसेच 02342-222333 वर संपर्क साधा.